धि गोवा हिंदु असोसिएशन मुंबई, या संस्थेच्या विद्यमाने गरजू व होतकरू गोमंतकीय विद्यार्थ्यांना, इ १० वी पासून उच्च माध्यमिक, बी.ए, बी.कॉम, बी. एससी, तसेच डिप्लोमा कोर्सेस, पोस्ट ग्रेजुएट, वगैरे अभ्यासक्रमासाठी साधारण शिष्यवृत्ती तसेच अभियांत्रिकी, फार्मसी, वास्तुशास्त्र, कृषी इंजिनिअरिंग, तंत्रज्ञान, वैद्यक, दंतवैद्यक, भारतीय तत्त्वज्ञान या पदवीधर अभ्यासक्रमांसाठी विशेष शिष्यवृत्ती दर वर्षी देण्यात येतात.२०२२-२०२३ सालाकरिता देण्यात येणाऱ्या या शिष्यवृत्तीसाठी, अर्ज मागविण्यात येत आहेत. शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी खाली नमूद करण्यात आलेल्या अटींची पूर्तता करणे जरुरीचे आहे.
इच्छुक विद्यार्थ्यांनी, धि गोवा हिंदु असोसिएशन, ३५८, गोमंतधाम, डॉ. डी.बी.मार्ग, मुंबई ४००००७ या संस्थेच्या कार्यालयाच्या पत्यावर संपर्क साधावा. ज्या विद्यार्थ्यांचे बँकेत स्वतःच्या नावाने अकाउंट नसेल तर तो त्यांनी सुरू करावा. त्यानुसार संस्थेला त्यांच्या अकाउंट मध्ये शिष्यवृत्ती जमा करता येईल. अर्ज मागणी तारीख १९ जुलै व स्वीकारण्याची तारीख १५ ऑगस्ट आहे.