The Goa Hindu Association

साधारण आणि विशेष शिष्यवृत्ती

(Apr 01, 2025)

साधारण शिष्यवृत्ती : - धि गोवा हिंदु असोसिएशन मुंबई, या संस्थेच्या विद्यमाने गरजू व होतकरू गोमंतकीय विद्यार्थ्यांना, इ १० वी पासून उच्च माध्यमिक, बी.ए, बी.कॉम, बी. एससी, तसेच डिप्लोमा कोर्सेस, पोस्ट ग्रेजुएट, वगैरे अभ्यासक्रमासाठी देण्यात येतात.


विशेष शिष्यवृत्ती : - अभियांत्रिकी, फार्मसी, वास्तुशास्त्र, कृषी इंजिनिअरिंग, तंत्रज्ञान, वैद्यक, दंतवैद्यक, भारतीय तत्त्वज्ञान या पदवीधर अभ्यासक्रमांसाठी विशेष शिष्यवृत्ती दर वर्षी देण्यात येतात.
२०२५-२०२६ सालाकरिता देण्यात येणाऱ्या या शिष्यवृत्तीसाठी, अर्ज मागविण्यात येत आहेत. शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी खाली नमूद करण्यात आलेल्या अटींची पूर्तता करणे जरुरीचे आहे.

 

  • शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांस कमीत कमी ६५% गुण असले पाहिजेत.
  • साधारण शिष्यवृत्तीसाठी अडीच लाख रुपयांपेक्षा कमी व विशेष शिष्यवृत्तीसाठी चार लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्यांनी उत्पन्नाचा दाखला शासकीय किंवा उपशासकिय अधिकाऱ्यांची सही शिक्यानिशी पाठवणे जरुरीचे आहे.
  • अर्जात दोन्ही अटींची पूर्तता नसेल तर विद्यार्थी/विद्यार्थिनी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरणार नाही.
  • टेलिफोन किंवा पत्रव्यवहार करण्यात येणार नाही. या विषयी अधिक माहिती www.goahinduasso.org या आमच्या वेबसाईटवर मिळेल.

इच्छुक विद्यार्थ्यांनी, धि गोवा हिंदु असोसिएशन, ३५८, गोमंतधाम, डॉ.डी.बी.मार्ग, मुंबई ४०० ००७ या संस्थेच्या कार्यालयाच्या पत्यावर संपर्क साधावा. ज्या विद्यार्थ्यांचे बॅंकेत स्वत:च्या नावाचे खाते नसेल तर ते त्यांनी सूरू करावे. त्यानुसार संस्थेला त्यांच्या खात्यामध्ये शिष्यवृत्ती जमा करता येईल. अर्ज मागणी तारीख १५ जुलै व स्वीकारण्याची तारीख १५ ऑगस्ट आहे.