धि गोवा हिंदु असोसिएशन, मुंबईतर्फे गरजू व होतकरू गोमंतकीय विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणाऱ्या साधारण व विशेष शिष्यवृत्तीसाठी (शैक्षणिक वर्ष २०२६–२०२७) अर्ज मागविण्यात येत आहेत.
इयत्ता १० वी नंतरचे उच्च माध्यमिक, बी.ए., बी.कॉम., बी.एससी., डिप्लोमा, पदव्युत्तर अभ्यासक्रम यांसाठी साधारण शिष्यवृत्ती दिली जाते. तसेच अभियांत्रिकी, फार्मसी, वास्तुशास्त्र, कृषी अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, वैद्यक, दंतवैद्यक, सनदी
लेखापाल आणि भारतीय तत्त्वज्ञान या पदवी अभ्यासक्रमांसाठी विशेष शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते.
शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:
विद्यार्थ्यांनी किमान ६५% गुण प्राप्त केलेले असावेत.
साधारण शिष्यवृत्तीसाठी वार्षिक उत्पन्न ₹२.५ लाखांपेक्षा कमी व विशेष शिष्यवृत्तीसाठी ₹४ लाखांपेक्षा कमी असावे.
यासाठी शासकीय किंवा उपशासकीय अधिकाऱ्यांचा सही-शिक्क्यासह उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे.
वरील अटींची पूर्तता न केल्यास अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
या संदर्भात कोणताही दूरध्वनी किंवा स्वतंत्र पत्रव्यवहार करण्यात येणार नाही. अधिक माहिती संस्थेच्या www.goahinduasso.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह धि गोवा हिंदु असोसिएशन, ३५८, गोमंतधाम, डॉ. डी. बी. मार्ग, मुंबई – ४०० ००७ या कार्यालयाच्या पत्त्यावर संपर्क साधावा. ज्या विद्यार्थ्यांचे स्वतःच्या नावाने बँक खाते नसेल त्यांनी ते सुरू करणे आवश्यक आहे, जेणेकरून शिष्यवृत्तीची रक्कम थेट खात्यात जमा करता येईल.
अधिक माहितीसाठी संपर्क: (श्रीमती पल्लवी राऊत) ९०८२१८३८०६.