डॉ. सुभाष भेंडे पुरस्कृत – श्री. शशिकांत नार्वेकर स्मृती नाट्यसंहिता पुरस्कार
डॉ. उमेश जोशी पुरस्कृत -अड़वोकेट उदय भेंब्रे कोंकणी ग्रंथ पुरस्कार
पुरस्कारांसाठी पुस्तकांच्या प्रती पाठविण्याचे आवाहन
धि गोवा हिंदु असोसिएशन या संस्थेतर्फे, पद्मश्री कविवर्य बा.भ. बोरकर यांच्या स्मरणार्थ देण्यात आलेल्या देणगीतून दर वर्षी, पद्मश्री कविवर्य बा.भ. बोरकर पुरस्कार, नवोदित गोमंतकीय साहित्यिकास (कोकणी/मराठी- कवी / लेखक) दिला जातो. तसेच डॉ. सुभाष भेंडे यांनी धि गोवा हिंदु असोसिएशनला दिलेल्या देणगीतून या वर्षी सर्वोत्कृष्ट मराठी नाट्यसंहितेस श्री. शशिकांत नार्वेकर पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२५ या काळात, प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या प्रत्येकी तीन प्रती, प्रकाशकांनी १५ जून,२०२५ पर्यंत धि गोवा हिंदु असोसिएशन कार्यालयाच्या पत्यावर पाठवाव्यात.
या वर्षापासूनच डॉ.उमेश सदानंद जोशी (ग्रीन प्लस फाऊंडेशन-मुंबई) यांनी धि गोवा हिंदु असोसिएशनला दिलेल्या देणगीतून सर्वोत्कृष्ट कोंकणी ग्रंथास -अड़वोकेट उदय भेंब्रे ग्रंथ पुरस्कार देण्यात येणार आहे. गैर काल्पनिक किंवा वास्तविक विषयावर आधारित (उदा. ऐतिहासिक, शैक्षणिक, वैज्ञानिक, राजकारण,संशोधनात्मक वगैरे) पुस्तकांमधून सर्वोत्कृष्ट कोंकणी ग्रंथाची/पुस्तकाची निवड करण्यात येईल . या पुरस्कारासाठी १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२४, या काळात प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या प्रत्येकी तीन प्रती, प्रकाशकांनी १५ जून,२०२५ पर्यंत धि गोवा हिंदु असोसिएशन कार्यालयाच्या पत्यावर पाठवाव्यात.
शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम असे वरील सर्व पुरस्कारांचे स्वरूप असून, संस्थेच्या होणाऱ्या वर्धापनदिनी विजेत्यांचा सत्कार करण्यात येईल. हस्तलिखितांचा विचार केला जाणार नाही.
कार्यालयाचा पत्ता:- धि गोवा हिंदु असोसिएशन,
गोमंतधाम, ३५८, डॉ. भडकमकर मार्ग,
मुंबई ४००००७