The Goa Hindu Association

धि गोवा हिंदु असोसिएशनच्या तीन प्रतिष्ठित साहित्य पुरस्कारांसाठी पुस्तक नामांकन सुरू

(Apr 25, 2026)

धि गोवा हिंदु असोसिएशनतर्फे दरवर्षी प्रदान करण्यात येणाऱ्या विविध प्रतिष्ठित साहित्य पुरस्कारांसाठी यंदा पात्र पुस्तकांच्या प्रती मागविण्यात येत आहेत. इच्छुक प्रकाशक व लेखकांनी आपली पुस्तके १५ जून २०२६ पूर्वी संस्थेकडे सादर करावीत, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

१. पद्मश्री कविवर्य बा. भ. बोरकर स्मृती पुरस्कार
पद्मश्री कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा हा पुरस्कार नवोदित गोमंतकीय साहित्यिकांसाठी (कोकणी/मराठी – कवी/लेखक) राखीव आहे. १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांचा या पुरस्कारासाठी विचार करण्यात येईल.

२. प्रा. जी. ए. कुलकर्णी पुरस्कार
डॉ. सुभाष भेंडे यांच्या देणगीतून प्रदान करण्यात येणारा हा पुरस्कार सर्वोत्कृष्ट अनुवादित मराठी पुस्तकासाठी दिला जातो. कोणत्याही भारतीय अथवा पाश्चात्य भाषेतून मराठीत अनुवादित झालेल्या पुस्तकांचा यासाठी विचार होणार असून, १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत प्रकाशित पुस्तकांना पात्रता राहील.

३. ॲड. उदय भेंब्रे कोंकणी ग्रंथ पुरस्कार
डॉ. उमेश सदानंद जोशी (ग्रीन प्लस फाऊंडेशन, मुंबई) यांच्या देणगीतून प्रदान करण्यात येणारा हा पुरस्कार सर्वोत्कृष्ट कोंकणी ग्रंथासाठी आहे. गैर-काल्पनिक अथवा वास्तवाधारित (ऐतिहासिक, शैक्षणिक, वैज्ञानिक, राजकीय, संशोधनात्मक,कायदेविषयक,जीवनचरित्र इ.) विषयांवरील पुस्तकांचा यासाठी विचार केला जाईल. १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत प्रकाशित पुस्तकांना पात्रता असेल.

वरील सर्व पुरस्कारांसाठी इच्छुक प्रकाशकांनी संबंधित पुस्तकांच्या प्रत्येकी तीन प्रती दिनांक १५ जून २०२६ पर्यंत संस्थेच्या कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवाव्यात. हस्तलिखितांचा विचार केला जाणार नाही, हे कृपया लक्षात घ्यावे

पुरस्काराचे स्वरूप
शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप असून, विजेत्यांचा सत्कार संस्थेच्या वर्धापनदिनी करण्यात येणार आहे.

पुस्तके पाठविण्याचा पत्ता:
धि गोवा हिंदू असोसिएशन, ३५८ गोमंतधाम, डॉ. भडकमकर मार्ग, मुंबई – ४०० ००७.
अधिक माहितीसाठी संपर्क: .( श्रीमती पल्लवी राऊत ) ९०८२१८३८०६